सुस्वागतम्

गावामध्ये १० वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे. अंगणवाडी ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण पुरवले जाते आणि आठवी ते दहावी पर्यंत न्यू इंग्लिश स्कूल किकली विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. तसेच गावामध्ये १ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३ खाजगी दवाखाने आहेत.गावची ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ आहे, ही तीन वार्ड मध्ये विभागली असून प्रत्येक वार्डामधून ३ असे एकूण ९ सदस्य निवडून त्यातून सरपंचांची निवड केली जाते.

ऑक्टोबर महिन्यात या गावची यात्रा भरते. या यात्रेचे वैशिष्ट्य हे आहे, की यात्रेत दिवसा भैरवनाथाचा छबिना असतो. ही यात्रा दसऱ्यानंतरच्या शनिवार व रविवार या दिवशी भरते. ही यात्रा या गावाचे बारा बलुतेदार भरवतात. यात्रेदरम्यान शनिवारी रात्री होणाऱ्या टकर बघण्यासारख्या असतात

सन २०११ च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या 4583 आहे तर सध्याची लोकसंख्या ५००० पर्यंत आहे. येथे सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाना राहतात तसेच ग्रामस्थ सर्व सण मोठ्या उत्साहाने आणि एकदिलाने साजरा करतात.

नीतिमान नागरिक हेच गावाचं भूषण " हे आपल्या गावचं ब्रीद , हीच आपली परंपरा , या परंपरेचे पाईक होण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करावा आणि एक आदर्श गावं म्हणून नाव मिळवावे हीच श्री . भैरवनाथ यांच्या चरणी प्रार्थना ....

आशा गावात राहतो म्हणून आम्हा गावकर्यांना आमच्या गावाचा अभिमान आहे.