सुविचार :-

माझ्याविषयी

तुम्हाला माझ्या बद्दल माहिती करून घ्यावी असे वाटले या बद्दल आनंद आहे. मी उत्कर्ष प्रदीप   शिंदे, .याच गावाच्या पवित्र मातीत माझा जन्म झाला. कोणालाही अभिमान वाटावा अशा “जिल्हा परिषद शाळा देगाव ” मधून मी माझे ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.या शाळेमध्ये किकलीगावातील माझे शिक्षक श्री .रविंद्र बाबर व शिक्षिका म्हणून त्यांच्या पत्नी सौ . विद्या रविंद्र बाबर यांचे मार्गदर्शन लाभले व मी इथपर्यंत येऊ शकलो. त्या नंतर भुईंज ,वाई , पुणे व मुंबई येथून मी माझे पुढील शिक्षण पूर्ण केले आणि सध्या एक संगणक तज्ञ म्हणून काम करत आहे. कविता लिहिणे , वाचन आणि मित्र परिवारा बरोबर गप्पा मारत बसने हे माझे छंद.

किकली सारख्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि अजूनही मी इथे राहतो याचा मला अभिमान आहे. या मातीने….या गावाने आजपर्यंत मला खूप काही दिले, त्यामुळे या गावाला जगापर्यंत पोहोचवायची ही एक धडपड आहे.

किकली डॉट इन च्या निर्मिती करीता बऱ्याच व्यक्तींचे सहकार्य लाभलेले आहे. किकली गावाचे सरपंच श्री. दिपक साहेबराव बाबर ( काका ) , श्री . क्षेत्र भैरवनाथ या पुस्तकाचे लेखक श्री . संजय साहेबराव बाबर (साहेब) , माझे चुलते श्री . भाऊसाहेब गुलाबराव शिंदे ,वडील श्री . प्रदिप गुलाबराव शिंदे ,माझे मित्र श्री.अभिजीत अरविंद बाबर ,सीमा शेडगे यांनी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. किकली डॉट इन च्या उभारणीत ज्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार….!!!!!….!!!!!

या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीमध्ये काही तृटी असल्यास किंवा काही माहिती अपुरी असेल तर कृपया मला त्याबद्दल मार्गदर्शन करावे.