प्राथमिक व माध्यमिक शाळा


किकली मध्ये सध्या दहावीपर्यंत शिक्षणाची उत्तम सोय असून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर्फे पुरवले जाते तर विद्यालयीन शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल किकली तर्फे दिले जाते. येथील शिक्षक व कर्मचारीवर्ग उच्चशिक्षित व सुसंस्कृत आहेत तसेच विद्यार्थांसाठी इमारत, क्रीडांगण, ग्रंथालय, व प्रयोगशाळेची उत्तम सोय असल्याने किकली परिसरातील शेजारील गावातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने येतात.


प्राथमिक शाळा

सध्या येथे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमार्फत दिले जाते, शाळेतील चालू शिक्षक संख्या ९ असून एकूण विद्यार्थीसंख्या ४५१ आहे, यामध्ये मुले २२४ व मुली २२७ आहेत. एकूण वर्गखोल्या ९ असून, संगणक संख्या ७ आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. .... मॅडम या आहेत.


माध्यमिक शाळा : न्यू इंग्लिश स्कूल किकली

खरोखरच या अर्थाचा गांभीर्याने विचार करूनच आमच्या गावातील सर्व वरिष्ठ मंडळीनी मनावर घेवून आपला हि गावामध्ये कमीत कमी माध्यामिक शिक्षण १०वी पर्यंत तरी असावे. गावातील मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्याचा जो त्रास होत असे व त्यांना या त्रासापासून मुक्त करून त्यांचा वेळेचा अपव्यय टाळण्याचा विचार करीत सर्व गावातील वरिष्ट मंडळी व गावकऱ्यानी मनावर घेवून गावामध्ये शाळा उभारणीसाठीचे काम करण्यास सुरुवात केली .इमारत :-

विद्यालयाचा इमारतीसाठी जागा मिळवणे ही एक महत्वाची बाब होती अशा परिस्थितीत सर्व ग्रामस्त मंडळींच्या केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे शाळेच्या इमारतीसाठी ४३५६० चौ. फुट जागा घेणे शक्य झाले. व त्यानंतर काही कालांतरे शाळेची स्वतःची सुमारे २०००० चौ. फुट मध्ये इमारत तयार करण्यात आली.

अंतर्गत सुविधा :-

१) प्रशस्त वर्ग.
२) अत्याधुनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा.
३) संगणक प्रशिक्षण प्रयोगशाळा.
४) स्वतंत्र सभागृह.
५) खेळाचे अत्याधुनिक साहित्य.
६) भव्य क्रीडांगण
७) खो-खो, कबड्डी, लांब उडी, ई. साठी स्वतंत्र क्रीडांगण

शिक्षक वृंद :-

१) - मुख्याध्यापक
२) - उपशिक्षक
३) - उपशिक्षक
४) - उपशिक्षक
५) - उपशिक्षक

क. लिपीक :-

१) - क. लिपीक

सेवक :-

१) - शिपाई
२) - शिपाई
३) - शिपाई
४) - शिपाई