ग्रामपंचायत


ग्रामपंचायत किकली हे सातारा लोकसभा, वाई विधानसभा मतदार संघातील, भुईंज गट व भुईंज गणातील प्रमुख गाव आहे. सन २०११ च्या जनगननेनुसार मतदार संख्या होती तर सध्या २८१६ पर्यंत आहे. जरी मतदार संख्या जास्त नसली तरी गावाच्या बाजूच्या वाड्या ह्या किकली गावावर अवलंबून असल्याने राजकीयदृष्ट्या किकलीला खूप महत्व आहे.

गावची ग्रामपंचायत सदस्य संख्या ९ आहे, ही तीन वार्ड मध्ये विभागली असून प्रत्येक वार्डामधून ३ असे एकूण ९ सदस्य निवडून त्यातून सरपंचांची निवड केली जाते. नुकतेच मा. आमदार मकरंद पाटील यांच्या निधीतून व सरपंच आणि ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे बांधकाम करण्यास सुरवात झाली आहे .

आजमितीस ग्रामपंचायत हद्दीत एकून घरांची संख्या ४०० पेक्षा जास्त आहे.विद्यमान सरपंच आणि सदस्यांची माहिती खालीलप्रामाणे,