सुविचार :-

ग्रामीण भारतातील जीवन

‘ग्रामीण भारतातील जीवन ' म्हटलेकी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो आपला गाव ! परंतु संपूर्ण भारतीय ग्रामीण जीवनाचा अभ्यास म्हटलेतर फार कठिण आणि असह्य ! कारण प्रत्येक ठिकाणीचा ग्रामीण भाग काही प्रमाणात विकसित आहे. तर काही प्रमाणात मगासलेला सुध्दा आहे .भारतातील जेप्रमुख समुदाय आहेत ,त्यातील हा एक ग्रामीण समुदाय! ……..हा आदिम व शहरी समुदायापेक्षा थोडा वेगळा !.

प्रत्येक समुदायाची एक संस्कृती असते,तसेच ग्रामीण समुदायाची पण आहे ,ग्रामीण समुदायाचा अभ्यास म्हटलेकी डोळ्यासमोर उभा राहतो तेथील निसर्ग, लोकांची विचारसरणी, राहणीमान.प्रत्येक समुदायाची विचारसरणी, राहणीमान.काही प्रमाणात का होईना वेगवेगळ्या स्वरूपाची आढळते .निसर्गाची देण लाभलेला भाग ,त्यामुळेतेथील जीवन अतिशय आनंदी ,स्वच्छंद असते . आकारमानानेलहान असल्या कारणानेलोक तेथेगुण्यागोविंद्यानेराहतात,पूर्वीचा ग्रामीण भाग आणि आताचा ग्रामीण समुदाय यात जमीन दोस्त फरक आढळतो.कारण पूर्वीच्या काळी लोक संस्कृतीला अनुसरूनच वर्तन करत होते ,परंतुआता पश्चात्यीकरणाचा प्रभाव हा संपूर्ण भारतावर झालेला आढळून येतो.आकारमानाने लहान असल्या कारणाने लोकसंख्या विरळ असते ,लोकसंख्या विरळ असूनही विभक्त कुटुंब पद्धती दिसून येते,कोणत्याही समुदायाचा विकास किवा उभारणी हि त्याच्या कुटुंबापासून होते,कुटुंब हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मुख्य पाया आहे ,जीवनाची सुरवात कोणत्याही समुदायापासून झाली तरी सर्वात प्रथम कुटुंबातून होते, त्यामुळे ग्रामीण समुदायात कुटुंबाला विशेष महत्त्व आहे ,पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पध्द्ती असायची परंतु त्याचे प्रमाण कमी झाले आहे.
शेती हा ग्रामीण समुदायाचा प्रमुख व्यवसाय आहे हे आपल्याला माहितच आहे आणि हा व्यवसाय ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाचा मुख्य पाया आहे .सुरवातीला शेती व शेतीवर आधारित जोडधंदे केले जायचे आजही केले जात आहे ,परंतु याचे प्रमाण कमी झाले आहे,पूर्वीच्या काळी शिक्षणाच्या सुविधा अल्प होत्या,त्यामुळे शेती व शेतीवर आधारितच ग्रामीण व्यवसाय केले जायचे पण आता २१ व्या युगात शिक्षणाचा प्रसार ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे पोचला आहे,तरुण मुले मुली शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. एकंदरीत विकास होत आहे ,परंतु जो भारताचा स्तंभ आहे त्या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे ,कारण मुले मुली शिक्षण घेवून कामधंद्यासाठी शहरात स्थलांतर करत आहे ,त्यामुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे ,यामुळे शेती या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आहे,आताच्या पिढीने या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे ,बरीच ग्रामीण भागातील विद्यार्थी कृषिक्षेत्रात अभ्यास करत आहेत किवा बऱ्याच जणांनी कृषि विषयक पदव्या प्राप्त करून आपली शेती सुजल ,सुफल केली आहे ,हि खूप आनंदाची बाब आहे ,कोणतेही गोष्ट यशस्वी करण्यासाठी लागतो तो म्हणजे वेळ, पैसा,मेहनत …...जर या तिघांचा समन्वय साधला गेला तर अशक्य काहीच नाही,परंतु बऱ्याच वेळा अडचण येते ती पैशाची .........त्याच्यावर हि उपाययोजना आहेत, त्यामुळे तरुण पिढीने इतर शिक्षणक्षेत्रात जरूर पाऊल टाकून चांगले शिक्षण घ्यावे ,परंतु शेतीकडे दुर्लक्ष करून नये कारण निसर्ग आहे तर हि मानवसृष्टी,संजीवसृष्टी आहे अन्यथा सर्व व्यर्थ ठरेल.

पाश्चात्यीकरण ,आधुनीकिकरणामुळे ,शिक्षणाच्या प्रसारामुळे ग्रामीण विचारसरणी बदल बोलायचेम्हटलेतर विचार प्रगल्भ, वैज्ञानिक होत चालले आहेत,परंतुआजही बऱ्याच जणांचेविचार अप्रगत असेआहेत. ग्रामीण लोकांच्या जीवनात धर्माला ,जातीला विशेष महत्व दिसून येते,त्यामुळे प्रथा ,परंपरा ,चालीरीती ,धर्मतत्त्वे आहेत आणि पालन आजही केले जाते ,तेथील लोक भावनिक, प्रेमळ असतात ,त्यामुळे तेथे सण-समारंभ एकजुटीने ,आपुलकीने साजरे होताना दिसतात .एकमेकांच्या गरजेला ही लोक उपयोगी पडतात ,म्हणजेच एकंदरीत सबंध कोणताही मानवी समुदाय म्हटला कि त्याच्या काही गरजा या असतात ,त्यातील प्रमुख अन्न ,वस्त्र ,निवारा ,शिक्षण ,आरोग्य ! पण या गरजांचे निराकरण ग्रामीण समुदायात होत आहे .अन्नाबद्दल म्हणायला गेले तर शेतीप्रधान समाज असल्यामुळे अन्नधान्याची टंचाई येथे जाणवणार नाही असे आपल्याला वाटते ;परंतु असे नाही ,गरिबीमुळे शेती असून सुध्दा मुबलक अन्न - धान्य त्या कुटुंबाला भेटत नाही. ज्या शेतकऱ्यामुळे संपूर्ण देश पोटभर जेवतो ,तेच कुटुंब बऱ्याच वेळा उपाशी असते. आपल्याला काय त्याचे ? कोण उपाशी आहे ?किवा कोण गरीब ,मी पोटभर जेवणार आणि श्रीमंत होणार ! हीच धारणा बऱ्याच जणांची असते.वस्त्र ,निवाराबद्दल म्हणायला गेले तर त्याची स्थिती ठीक आहे ,पण विभक्त कुटुंबामुळे जे निवाऱ्याचे स्थान आहे त्यात बऱ्याच वृध्द व्यक्तीच्या डोक्याखालून छत्र नष्ट होत आहे. शिक्षण आणि आरोग्य या सुध्दा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत .शिक्षणाशिवाय जीवन म्हटले कि नरकच होय.हि सुविधा ग्रामीण भागात पोचली आहे पण सगळ्याच खेड्यात पोचली असे म्हणता येणार नाही .आजही मैल -मैल अंतर गाठून विद्याथ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. बऱ्याचवेळा शिक्षणाच्या सुविधा अपुऱ्या पडत आहे .विद्यार्थी प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण घेत आहेत ,बऱ्याच ठिकाणी पदवी ,उच्च पदवीत्तर शिक्षणसुद्धा घेतले जात आहेत शिक्षणाचा योग्य उपयोग करून कुटुंब ,समाजाचा विकास साधत आहेत आणि हा विकास देश्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे.

पूर्वीच्या काळी शिक्षणाबाबतीत मुलामध्ये भेदभाव केले जात होते .आजही त्याचा त्रास थोड्या प्रमाणत का होईना ? सहन करावा लागत आहे .मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न कुटुंबातील करत होते किवा करत आहे ,पण मुलीच्या बाबतीत यांचे प्रमाण कमी होते ,तिचे जीवन फक्त कुटुंबापुरते मर्यादित ठेवले जात होते आणि काही ठिकाणी ते आजही ठेवले जाते .तिची इच्छया असूनही किवा ती मुलगी हुशार असूनही तिला शिक्षणापासून वंचित ठेवले जाते .तिच्या विकासात अडथळा निर्माण केला जातो ,परंतु असे होणे चुकीचे आहे ,कारण समाज हा स्त्री -पुरुषावर आधारलेला आहे .त्यामध्ये स्त्रीलाच गोण दर्जा देणे कितपत योग्य ! परंतु आजही ग्रामीण भागात बऱ्याच महिलांनी शिक्षण घेवून आपला ,कुटुंबाचा दर्जा उंचावला आहे. योग्य शिक्षण घेवून या मुली राज्याचा व देशाचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे .ग्रामीण भागात पुरुषाच्या बरोबरीने स्त्रिया शेती या व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात . तसेच ग्रामीण भागात महिला बचत गटातून पुढे येवून कार्य करत आहे आणि ही आनंदाची बाब आहे पण आजही बऱ्याच जणांचा शिक्षणाचा मुख्य हेतू पैसा कमवणे हाच वाटतो ,पण माझ्या मते शिक्षण ही विद्येची वाणी आहे ,शिक्षण म्हणजे स्वतःची मानसिक दुष्ट्या विचार करण्याची प्रवृत्ती प्रगल्भ करणे होय. दिलेल्या शिक्षणाचा उपयोग जीवनात पुरेपूर करणे ,स्वच्छ चांगले विचार सोबत बाळगणे,आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतः च्या प्रगती बरोबर समाजाची राष्ट्राची प्रगती करता आली पाहिजे.

आरोग्य हि पण महत्त्वाची गरज आहे, कारण जर आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण इतर गरजांचा उपभोग घेवू शकतो.आरोग्य बदलच्या ज्या सुविधा खेड्या -पाड्यात पोचल्या आहेत. पूर्वी अंधश्रद्धेमुळे लोक वैद्यकीय उपचार टाळत ते साधू संत किवा इतर उपचार पद्धतीला महत्त्व देत होते,परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे .आरोग्य सुविधा पोचल्यामुळे वैद्यकीय उपचार घेवून स्वास्थ नीट ठेवत आहे या सुविधा खेड्यामध्ये काही तासासाठी असतात ,मध्यरात्री जर एखाद्याला असह्य वेदना होत असतील तर उपचाराचे कोणतेच साधन जवळ पास नसते ,त्यामुळे बऱ्याच जणांचा यातून मृत्यू होत होता,ज्या सुविधा शहरात आहेत ,त्या ग्रामीण भागात खूप कमी आहेत .
पाणी आणि वीज याबद्दल हेच म्हणावे लागेल, साठा योग्य होत नसल्यामुळे दुष्काळ सारख्या स्थितीला सामोरे जावे लागत आहे .पाण्याचे नीट नियोजन नाही तर काही वेळा त्याचा नीट वापर नाही ,या सगळ्या गोष्टीमुळे पिण्याच्या पाण्याची ,वापरण्याच्या पाण्याची ,शेतीच्या पाण्याची टंचाई जाणवते. विजेबदल म्हणायचे झाले हि सुविधा भेटते पण अल्प प्रमाणात! त्यामुळे विकासासाठी अनेक अडथळे निर्माण होत आहे,जर राष्ट्राचा विकास खर साधायचा आहे .तर प्रत्येक गावाचा विकास झालाच पाहिजे ,तर खऱ्या अर्थाने राष्ट्र विकसित होईल ,अन्यथा बेकारी ,गरिबी , अज्ञानता,दुष्काळ ,शहराची वाढती लोकसंख्या या सारख्या 21 व्या युगात एकंदरीत पाहिले तर ग्रामीण भागाचा विकास झाला .ग्रामीण भागाचा विकास करण्याचे काम अनेक सुधारकांनी ,विचारवंतानी केले आहे ,खरे तर आपण त्यांचे ऋणी असायला पाहिजे. कोणत्याही समुदायाचा विकास साधायचा असेल तर सर्व प्रथम त्या समुदायात एकजूटपणा असणे गरजेचे आहे आणि ग्रामीण भागाचा विकास चांगल्या प्रकारे करावयाचा असेल तर सर्वात प्रथम विचारसरणी हि वैज्ञानिक दृष्टीकोण पद्धतीची ठेवणे गरजेचे आहे. खरे तर देशाचा विकास होण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक गाव विकसित होणे गरजेचे आहे .जर ग्रामीण भाग विकसित झाला तर नक्कीच देश विकसित होईल.ग्रामपंचायत ही परिपक्व विचारसरणीची असली पाहिजे.तर गावाचा विकास साधला जाईल असे वाटते .