सुविचार :-

पहिल्या पावसात भिजताना

पहिल्या पावसात भिजताना......
वैशाखामासी एका सकाळी मेघ दाटून आले
सरीवर सरी झेलुन, अंग चिंब चिंब झाले
पहिल्या पावसात भिजताना मन आनंदून गेले
पण क्षणातच चेह-यावरचे सारे सुख मावळले. आभाळाचे छत
उशाला दगड निजत होतो सुखात धरतीच्या कुशीत.
पहिल्या पावसात भिजताना जाणिव झाली खास
झोपडीसाठी काहीतरी करावा लागणार प्रयास
आभाळाच्या छताखाली हवा आहे निवारा
ठिगळं लावलेला कागद बनला आहे पोत्यारा
कुठे संसार मांडू आता? मन झाले उदास
तान्हं माझं खेळतयं पाणी दिसतय आसपास
पहिल्या पावसात भिजताना चुल दिसतेय विझताना
पैसा नाही गाठीला कसा आधार देवू ताटीला
पण कसली पाहीजे कंबर आता
कारण आभाळाला ठिगळ नाही येत लावता......


- कवयित्री सौ. अपर्णा अतुल माने - बाबर,
श्री. अरविंद रामकृष्ण बाबर ( गुरूजी) यांची कन्या