प्राथमिक शाळा :-

किकली गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून तिची स्थापना ३ जून १८६७ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली, प्राथमिक शाळेमध्ये १ ते ७ पर्यंत चे प्राथमिक शिक्षण दिले जाते .

किकली येथील शाळा हि केंद्र शाळा असून या केंद्रशाळेच्या विभागामध्ये १२ प्राथमिक शाळा येतात त्याच्यामध्ये देगाव , शिरगाव ,किकली ,मापरवाडी , वाखंडवाडी ,गोवेदिगर , निकमवाडी ,लगडवाडी , खोलवडी , काळंगवाडी ,राऊतवाडी ( खालची ) यांचा समावेश होतो .

आजच्या आधुनिकिकरण्यच्या युगात मुलांना संगणक प्रशिक्षण मिळावे यासाठी गावातील ग्रामस्थांनी व जिल्हा परिषदने ६ संगणक इंटरनेट जोडणीसह उपलब्ध करून दिले आहेत. तसेच शाळेतील मुलांची शैक्षणिक व सामाजिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम व योजना राबिविल्या जातात .

१) मोफत पाठ्यपुस्तक

२) मोफत स्वाधायपुस्तिका

३) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

४) नवोदय परीक्षा इयत्ता ५ वी साठी