राबविलेल्या योजना :-

कृषिप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणा-या आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्राला खूप मोलाचे असे स्थान आहे. त्याच महाराष्ट्रात किंबहुना भारतामध्ये शेतकरी तसेच ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे खूप महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जातात. अशा राबविल्या गेलेल्या योजनांना किकली ग्रामपंचायती तर्फे खूप चांगला प्रतिसाद दिला गेलेला आहे.

आजपर्यंत किकली मध्ये ग्रामस्थांनी गावामध्ये राबविल्या गेलेल्या सर्व योजनांचा लाभ घेतला आहे तसेच विविध अभियानांमध्ये आपला सक्रीय सहभाग नेहमीच दर्शविला आहे. किकली मध्ये गेल्या काही वर्षामध्ये राबविल्या गेलेल्या योजनांची माहिती आम्ही ह्या विभागामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत.

१) इंदिरा गांधी आवास योजना

२) राष्ट्रीय कृषी विकास योजना

३) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना

४) महाराष्ट्र शासन सार्वजनिक ग्रामविकास योजना

५) सर्व शिक्षण अभियान

६) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

७) पर्यावरण ग्राम जनजागृती अभियान

८) महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम

९) यशवंत ग्रामसमृद्धी योजना

१०) गावातील महिलांसाठी महिला बचत गट योजना