विकास सेवा सोसायटी :-

“किकली विकास सेवा सोसायटी” हि संस्था किकली गाव चा खऱ्या अर्थाने आर्थिक आधारस्तंभ आहे.स्वातंत्र्यपूर्वकाळात शेती करण्यासाठी अल्पभूधारक किंवा सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक गरजांसाठी सावकारांकडून अवास्तव व्याजाने कर्ज घ्यावे लागत होते.सर्व सामन्यांच्या गरजा केंद्रबिंदू मानून शासन व शेतकरी यांच्या माध्यमातून किकलीगाव विकास सोसायटी ची स्थापना दि.../../.... रोजी झालेली आहे.किकली गाव विकास संस्थेने गावातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी गरजेच्या वेळी पतपुरवठा केलेला आहे.यांनी यामध्ये राजकारण न् येऊ देता सर्वाना “समान न्याय” या तत्वावर कुठल्याही सभासदाची अडवणूक केलेली नाही. शेती साठी पाईपलाईन /ठिंबक सिंचन शेतघर यासारख्या अनेक योजनांसाठी याच संस्थेने सभासदांना पाणीपुरवठा केलेला आहे.राष्ट्रीयकृत बँका या आज शेतकऱ्यांना पतपुरवठा करतात परंतु खऱ्या अर्थाने गरज आहे होती ती मागेल त्या सभासदास कर्ज व ते काम माझी किकली विकास सेवा सोसायटी करते.व त्यामुळे किकली या गावची आर्थिक भरभराट झालेली आपण किकली गावला भेट दिल्यास पाहायला मिळेल .

पिक कर्ज असो व मध्यमुदत कर्ज असो मागेल त्या सभासदास आर्थिक पुरवठा या संस्थेने केलेला आहे. संस्थेने असणाऱ्या शेयर्स पोटी सभासदास सातत्याने १२% पर्यंत लाभावंश दिलेला आहे .याच संस्थेच्या माध्यमातून अनेक सभासदांनी शेती सुधारणा,मुलांचे उच्च शिक्षण ,लग्न ,घर बांधणी यासारख्या गरजांसाठी वेळच्या वेळी पतपुरवठा होऊन हि कामे करता आली आहेत.याच संस्थेच्या माध्यमातून अनेक सभासदांनी संस्था स्थापनेपासून आजपर्यंत चौथी पिढी या संस्थेकडून अर्थसहाय्य घेत आहेत.हि किकलीगाव च्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.यामुळेच सर्व सभासदांना आमच्या या संस्थेचा अभिमान आहे….